Aaditya Thackeray On Section 144 In Mumbai: मुंबईत कलम 144 अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत लागु होणार्‍या जमावबंदी नियमावर आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण
Aaditya Thackeray (Photo Credits: IANS/File)

मुंंबई मध्ये कोरोना रुग्णांंचे (Coronavirus In Mumbai) वाढते आकडे पाहता आज, 17 सप्टेंबर पासुन 30 सप्टेंबर पर्यंत शहरात जमावबंंदी लागु करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली मात्र त्यातील बंंदी हा शब्द वाचुन अनेक जण संभ्रमात पडले आहेत. आता पुन्हा लॉकडाउन कठोर होणार का असे प्रश्न अनेकांंच्या मनात निर्माण झाले असतील या सगळ्या प्रश्नांंवर मुंंबईचे पालकमंंत्री व महाराष्ट्र पर्यावरण आणि पर्यटन मंंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांंनी ट्विट करुन उत्तर दिले आहे. कलम 144 लागु असताना मुंबईकरांंनी घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही यापुर्वी 31 ऑगस्ट पर्यंत लागु असलेली जमावबंंदीच पुढील काही दिवस लागु राहणार आहे, यात कोणताही नवा नियम लागु केलेला नाही असे आदित्य यांंनी ट्विट केले आहे. त्यामुळे यात पॅनिक होऊन कोणीही चुकीची माहिती पसरवु नये. Coronavirus In Dharavi: मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 15 रुग्ण आढळल्याने आकडा 2975 वर पोहचला

मुंंबई पोलिस आयुक्तालयाकडुन कडुन जारी करण्यात आलेल्या माहितीत सुद्धा जमावबंंदी आणि कलम 144 लागु करण्याबाबत अत्यंत स्पष्ट पणे सांंगण्यात आले होते. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्प्या ट्प्प्याने लॉकडाउन उघडले जाणार आहे सध्या कोणत्याही प्रकारचे नवे निर्बंध लागु केलेले नाहीत.

आदित्य ठाकरे ट्विट

ANI ट्विट

दरम्यान, सध्या मुंंबई मध्ये सध्या दुकाने, कार्यालये, पुर्णवेळ उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. या जमावबंंदी काळातही यामध्ये बदल होणार नाहीत मुंंबई लोकल आणि बेस्ट बस मधुन अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचाऱ्यांना या काळात प्रवास करता येणार आहे. मात्र सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असणार आहे. कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवावे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.