Aaditya Thackeray On Snake at Matoshree Premise: 'मातोश्री' च्या परिसरात सापडलेल्या सापावरून आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
AUT On Snake | Twitter

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान आलेल्या 'मातोश्री' (Matoshree) बंगल्याच्या परिसरात आज सकाळी 4 फूटी किंग कोब्रा (King Cobra) सापडला होत्या. यामुळे काही काळ तारांबळ उडाली मात्र सर्पमित्रांनी त्याची सुखरूप सुटका करून नैसर्गिक अधिवासात त्याला सोडलं. मात्र यावरून भाजप- ठाकरे गटाने एकमेकांवर टीका-टीपण्णी देखील केली आहे. मातोश्री जवळ सापडलेल्या सापाच्या वृत्तानंतर भाजपाच्या आशिष शेलार यांनी "उद्धव ठाकरे कितीही विषारी बोलत असले तरी त्यांच्या घरी असे साप कोणी सोडू नये," असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली. यावर थेट प्रतिक्रिया देणं आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) टाळलं असलं तरीही सापावरून भाजपा, शिंदे गटाला मात्र त्यांनी टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना 'काल मातोश्रीच्या बाजूच्या एका बंगल्यात नाग सापडल्याचं म्हटलं तर आज हा साप तेजस ठाकरे ला 'बर्थ डे विश' करण्यासाठी आला असल्याचं म्हटलं. पण साप जर भाजपा कार्यालय किंवा मिंधे कार्यालयात गेला असेल तर तो विष रिफिल करायला गेला असेल असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Uddhav Thackeray यांच्या 'मातोश्री' निवासस्थान आवारात आढळला किंग कोब्रा साप (Watch Video). 

गद्दार आणि सध्या देशात विष पसरवणार्‍यांमधील 'विषाचा' आधी अंदाज आला नाही ते आता दिसतय पण सापांना बघून मात्र विषारी, बिनविषारी साप ओळखता येतो असं म्हटलं आहे.

दरम्यान आज मातोश्री वर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरेंनी बीएमसी मधील घोटाळेबाजांना सोडणार नाही असा पुन्हा इशारा दिला आहे. तसेच सत्तेत आल्यानंतर मुंबईतील टोल बंद करणार असल्याचं म्हटलं आहे.