आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी म्हणाले, 'ट्रोलर्सकडे लक्ष देऊ नका, विरोधकांना बरनॉलची गरज'
Aaditya Thackeray (Photo Credits: Twitter)

शिवसेना (Shiv Sena) युवा आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कोणाचेही नाव घेता भाजप आणि विरोधकांन आणि ट्रोलर्सना (Trollers) जोरदार टोला लगावला आहे. वचनं न पाळता जे सत्तेतून नुकतेच बाहे पडली आहेत त्यांचे दुख: समजण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. परंतू, ट्रोलर्सकडेही लक्ष देण्याची अजिबात गरज नाही. ज्या लोकांना काही कान नसते ते लोग ट्रोलर्स असतात, असाही टोला ठाकरे यांनी लगावला. महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) राज्याच्या विकासासाठीच काम करत आहे, असेही ठाकरे या वेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकासआघाडी सरकारने आता वचनपूर्ती करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वत: विविध विषयांमध्ये लक्ष घालून निर्णय घेत आहेत. त्यामुळे विकासासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडत आहेत. दरम्यान, वचने न पाळता जे लोक सत्तेतून बाहेर गेले किंवा ज्यांना बाहेर पाठवले गेले असेल लोक सरकारवर टीका करत आहे. त्यांच्याकडे वेळ खूप आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल देऊया जिथे कुठे इंटरनेट सुरु असेल तिथून ते ट्रोल करत राहतील, असे सांगतानाच विरोधकांना बरनॉल द्या असे मी म्हणणार नाही, असाही मिष्कील टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केवळ शिवसेना, किंवा सरकारलाच ट्रोल केले जाते आहे असे नाही. अनेक पत्रकार मला माहिती आहेत. ज्यांना ट्रोल केले जाते. खास करुन महिला पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीह ट्रोल केले जाते. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; शपथविधीसाठी विधान भवन परिसरात तयारी सुरू

अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता आपण राज्यातील विकासावर बोलू. राज्यासमोर आज अनेक प्रश्न आहेत. त्याच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्न करु. राज्याच्या हितासाठी जर विविध प्रश्न मांडता आले. त्याबाबत काही अधिक करता आले तर ते पाहू, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांच्याबाबतच्या प्रश्नाला बगल दिली.