New Mumbai: प्रेमप्रकरणातून तरुणीचा उड्डाणपुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; पहा व्हिडिओ
Suicide | (Photo Credits: Pixabay)

New Mumbai: नवी मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीने फ्लायओव्हर (Flyover) वरून नदीत उडी मारून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही महिला फ्लायओव्हरवरून उडी मारण्याच्या तयारीत असताना नागरिकांनी तिला परावृत्त करून तिची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने कोणाचही न ऐकता थेट पाण्यात उडी घेतली.

ही घटना नवी मुंबईतील तळोजा (Taloja) परिसरात फ्लायओव्हरच्या फेज 1 आणि फेज 2 च्या जंक्शनवर घडली. या दोन टप्प्यांना जोडणाऱ्या नदीवरील फ्लायओव्हरवरून उडी मारून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कठोर पाऊल उचलले. या घटनेचा व्हिडिओ फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Latur Crime: कुमठा गावात सापडला मुलाचा मृतदेह, तासाभरात उकलले गुढ, आरोपीला अटक)

प्रेमप्रकरणातून झालेल्या निर्णयामुळे तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. ही घटना नवी मुंबईतील तळोजा परिसरात घडली आहे. फ्लायओव्हरच्या पॅरापेटवर ही महिला उभी असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी तिला उडी न घेण्यास सांगितले. परंतु, ही हृदयद्रावक घटना व्हिडिओत कैद झाली आहे. (हेही वाचा - Latur Crime: लातूरमध्ये दोन सख्खा चुलत भावांची हत्या, पूर्व वैमनस्यातून केल्याचा संशय, तीन आरोपी अटकेत)

पहा व्हिडिओ - 

तथापी, या महिलेची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.