Pune Shocker: पुण्यात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. आपलं अधिकारी व्हायचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शहरात येत असतात. दरम्यान पुणे शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यासाठी आलेल्या विद्यार्थीनीने आपलं आयुष्य संपवले आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अभिलाषा मित्तल असं तरुणीचे नाव आहे, ही मुळ वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होती. विद्यार्थीनीने आत्महत्या का केली हे कारण अद्याप समोर आले नाही. खडक पोलिस या घटनेची तपासणी करत आहे. (हेही वाचा- पुण्यातील प्रतिष्ठित कंपनीच्या कँटीनमध्ये समोस्यांमध्ये सापडले कंडोम, दगड, तंबाखू आणि गुटखा
मिळालेल्या माहितीनुसार, स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी तरुणी वाशिमहून पुण्याला गेल्या महिन्यात वास्तव्यास आली होती. पुणे येथील गुरुवार पेठेत एका हॉस्टेलमध्ये मैत्रिणींसोबत राहायची. काल अभिलाषा खोलीत एकटी होती. खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता. थोड्यावेळाने काही निमित्तासाठी मैत्रिणी अभिलाषाच्या खोलीकडे गेले आणि दरवाजा वाजवला. आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यासगळ्या खिडकीपाशी गेल्या.
खिडकीतून डोकावलं तर अभिलाषा ही लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. हे पाहून मुलींनी आरडाओरड केली आणि पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खून असल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासणीतून दिसून आले. पोलिस या घटनेची तपासणी करत आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हे तपासत आहे. पालकांची, नातेवाईकांची आणि मैत्रिणींची पोलिस चौकशी चालू आहे.