Nashik Crime: धारदार शस्त्राने वार करत तरुणाची भररस्त्यात हत्या, थरारक घटनेचा Video समोर
Nashik Crime News PC TWITETR

Nashik Crime:  पुणे जिल्ह्यानंतर नाशिक शहरात देखील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात संगमेश्वर येथे धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा एका तरुणावर एका टोळक्यांनी हल्ला (Attack) केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पूर्ववैमन्यस्यातून तरुणाचा भररस्त्यात खून केला आहे. (हेही वाचा- अज्ञात वाहनाच्या धडकेत ऑन ड्युटी पोलिस हवालदाराचा अपघाती मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, रफिक शेख असं मृत तरुणाचे नाव आहे. तरुण संगमेश्वर येथील रहिवासी होता. शहरातील सांडवा पुलासमोरील इसाक चौकात ही धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून सहा ते आठ जण एका तरुणाचा पाठलाग करत होते. एकाने धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला केला. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला होता. भररस्त्यात ही घटना रात्रीच्या वेळी घडली आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. पूर्ववैमन्यसातून तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरातील अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गुड्यांना पोलिसांचा धाक उरलाच नाही असं नागरिकांनी पोलिस प्रशासनाला प्रश्न विचारला आहे.