Nagpur Crime: प्रेम प्रकरणातून चाकूने 25 वेळा वार करून मित्राची हत्या, आरोपींना अटक
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Nagpur Crime:  नागपूरमध्ये प्रेम प्रकरणातून एका मित्राने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. मित्राला निर्जनस्थळी घेऊन जाऊन हत्या केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, पुढील कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अवघ्या काही तासांत अटक केले आहे.  हेही वाचा- मित्रांच्या भांडणात एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी अंत, गुन्हा दाखल,

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परिसरात प्रेम प्रकरणातून हत्या केली आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. रवी सावा (२६) असं मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो इंदौर येथील रहिवासी होता. रविच्या हत्ये प्रकरणात आवेश मिर्झा बेग, कुणाल खडतकर आणि आयुष पेठे या आरोपींना अटक केले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. पोलिसांच्या चौकशीत तिघांन्ही केल्याचे हत्येची कबुली  दिली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून मृताला ताब्यात घेतले.त्यानंतर त्याचा फोन तपासणीत देण्यात आले. फोन नंबरच्या आधारे घटनेची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. मारेकरूनी रवीच्या अंगावर धारदार शस्त्राने २५ वेळा वार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रवि एका तरुणी सोबत प्रेमप्रकरणात होते. याचाच त्यांना राग आल्याने रविला संपवण्याचे ठरवले.  हत्या झाल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते.पोलिसांना काही तासांतच आरोपींना अटक केले. आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रविच्या हत्येनंतर कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.