प्रेमाचा उत्सव मानला जाणारा व्हॅलेंटाइन डेच्या (Valentine's Day) पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकच्या गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरात एका तरूणाने प्रेमभंगातून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज (13 फेब्रुवारी) सकाळी घडल्याचे समजत आहे. मृतदेहाशेजारीच स्थानिक पोलिसांना एक पिस्तूल देखील सापडले आहे. या तरुणाकडे गावठी कट्टा कुठून आला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आत्महत्याची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर पालक वर्गांमध्ये चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित राजेंद्र नागरे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. रोहितचा आज सकळी नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात गोळ्या झाडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ माजली. रोहितने प्रेमभंगातून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांना त्याच्याशेजारी गावठी कट्टा सापडले आहे. त्याआधारे शोध लावत नाशिक पोलीस प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोहोचले आहेत. परंतु, रोहितकडे हा गावठी कट्टा कुठून आला? याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. या संदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र
दरम्यान, येत्या व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या घटना चिंताजनक आहेत. अवघ्या 4 दिवसातील तिसरी घटना असल्याची माहिती देखील समोर आली आहे. प्रेमभंगातून याआधीही अनेकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. मात्र, व्हॅलेंटाईन डेच्या तोंडावर अशाप्रकारच्या घटना पालकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.