Woman Gives Birth On Street In Kurla: मुंबईत कुर्ला (Kurla) येथे एका 30 वर्षीय महिलेने रस्त्यावर बाळाला जन्म दिला. या महिलेच्या मदतीला पोलिस धावून आले. पोलिसांनी महिलेला आणि तिच्या नवजात बाळाला जवळच्या नागरी रुग्णालयात दाखल केलं. या घटनेचा तपशील शेअर करताना मुंबईच्या व्हीबी नगर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी दुपारी कमानी जंक्शनजवळील रस्त्यावर एका महिलेची प्रसूती झाल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर काही वेळातचं पोलिसांचं पथक महिलेजवळ पोहोचले. पोलिसांनी महिलेला आणि तिच्या बाळाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) रुग्णालयात दाखल केले. सुवर्णा मिरगल असे या महिलेचे नाव आहे. (हेही वाचा -Mumbai Accident: वांद्रे सी-लिंकवर रस्ता अपघात, टोलनाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना भरधाव कारची धडक, तिघे ठार)
सुवर्णा यांनी कमानी जंक्शनजवळ रस्त्यावर बाळाला जन्म दिला. त्यानंतर महिला बेशुद्ध झाली. आम्हाला प्रसूती झाल्याची माहिती मिळताच निर्भया पथकाच्या नेतृत्वाखालील एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिला आणि तिच्या नवजात बाळाला जवळच्या बीएमसी रुग्णालयात दाखल केले. आई आणि बाळ दोघांवरही वेळेवर उपचार झाले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
निर्भया पथक मुंबई पोलिसांच्या एका विशेष पथकाचे नेतृत्व करते, जे महिलांवरील गुन्हे रोखण्याचे काम करते. या पथकामध्ये प्रशिक्षित महिला पोलीस कर्मचारी असतात, जे नियमित गस्त घालतात. या पथकाला लैंगिक छळ, पाठलाग, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यांसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.