Mumbai Accident: वांद्रे सी-लिंकवर रस्ता अपघात, टोलनाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना भरधाव कारची धडक, तिघे ठार

वांद्रे वरळी सी- लिंक वर मोठा अपघात झाला आहे. रात्रीच्या वेळी भरभाव कारने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.

Mumbai Accident: वांद्रे सी-लिंकवर रस्ता अपघात, टोलनाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना भरधाव कारची धडक, तिघे ठार
Mumbai Car Accident

Mumbai Accident:  मुंबईतील (Mumbai) वांद्रे वरळी सी- लिंक वर मोठा अपघात झाला आहे. रात्रीच्या वेळी भरभाव कारने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. वांद्रे वरळी सी लिंकवरील टोलनाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या वाहनांना मागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा वाहनांचा एकत्र अपघात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरळी वांद्रे सी लिंकवर गुरुवारी रात्री हा अपघात घडून आला. सहा वाहनांची एकमेंकाना धडक लागल्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. वरळी येथील पोलिस अपघात स्थळी दाखल झाले. या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले आहे आणि तीन जणांना जागीच मृत्यू झाला. जखमी लोकांना मुंबईतील भाभा रुग्णालयात आणि लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

इनोव्हा कार वरळीहून वांद्राच्या दिशेनं भरधाव वेगाने जात होती. इनोव्हा कारमधून सहा जण प्रवास करत होते. इनोव्हा कारची मर्सिडीज गाडीला नित्रयंण सुटल्यामुळे धडकली. पुढे जाऊन या कारनं वांद्रे सीलिंकवरील टोलनाक्यावर टोल भरत असलेल्या इनोव्हा आणि क्विड गाडीला पाठीमागून जोरदार धडक मारली. इनोव्हा गाडीच्या पाठोपाठ होंडा सिटी कारनंही इनोव्हा गाडीला धडक देत. या धडकेत तिघे जण गंभीर होऊन त्यांच्या मृत्यू झाला.

 

(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2023 08:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).