Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Cases In Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील आज सकाळी 71 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 13 हजार 440 वर पोहोचला आहे. यातील 9 हजार 338 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात घरी सोडण्यात आल आहे. तसेच आतापर्यंत 462 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या जिल्ह्यात 3 हजार 640 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील अँटीजन चाचणीद्वारे आढळलेल्या 38 रुग्णांचा समावेश आहे. (हेही वाचा - Mumbai Coronavirus Update: मुंबईमधील झोपडपट्टी भागात 57 टक्के लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग, झोपडपट्टी नसलेल्या भागात फक्त 16 टक्केच संक्रमित लोक- Sero Survey)

आज सकाळी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील 41 जणांचा समावेश आहे. यात पाचोड, पैठण (2), नूतन कॉलनी, गंगापूर (1), औरंगाबाद (9), फुलंब्री (1), सिल्लोड (2), वैजापूर (15), पैठण (7), सोयगाव (4) जणांचा समावेश आहे. तर मनपा भागात आज 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आज जिल्ह्यात चार कोरोनबाधितांचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समता नगर, शिक्षक कॉलनीतील 58 वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील 59 वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील 70 वर्षीय पुरूष आणि फाजलपु-यातील 46 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.