Coronavirus: महाराष्ट्रातील नागरिकाना मोठा दिलासा; राज्यात आज 1 हजार 408 रुग्ण कोरोनामुक्त
Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यात आज एकूण 1 हजार 408 रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 726 वर पोहचली आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकांना तात्पूर्ता दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. डॉक्टरांच्या उपचाराला आणि रुग्णांच्या इच्छाशक्तीला यशस्वी करण्यातील सर्वात महत्वाचा दुवा परिचारिका ठरत असून रुग्णाची शुश्रुषा करुन त्याला कोरोनामुक्त करण्यासाठी त्या परिश्रम घेत आहेत. कोरोनाच्या लढ्यात रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा देऊन अहोरात्र झटणाऱ्या, हिमतीने लढणाऱ्या सर्व परिरचारीकांचे संपूर्ण देशातून कौतूक केले जात आहे. हे देखील वाचा- BMC: मुंबईत एकूण 25 हजार 317 कोरोनाबाधित; दिवसभरात 1 हजार 382 नव्या रुग्णांची नोंद तर, 41 जणांचा मृत्यू

ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.