Pune: पुणे शहरातील एका खासगी शाळेत एका सहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शाळेतील अनेक पालकांनी शिक्षकाविरुध्दात संताप व्यक्त केला असून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला आहे. विद्यार्थ्याने शर्ट इन न केल्यामुळे शिक्षकांने त्याला मारहाण केली. शाळेतील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (हेही वाचा- फोन हिसकावून घेतल्याच्या रागातून 10 वर्षांच्या मुलाचा आईवर बॅटने हल्ला; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Watch)
मिळालेल्या माहितीनुसार, या संतापजनक घटनेनंतर मनसे पक्षातील काही नेत्यांनी पाऊल उचलले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकाला चोप दिला. पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकाविरुध्दात गुन्हा दाखल केला आहे. वर्गात केलेल्या मारहाणी नंतर मुलगा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. संदेश भोसले असं शिक्षकाचे नाव आहे. ही घटना पुण्यातील सेलिसबरी पार्क येथील शाळेत घडली. आयुष हिवळे असं पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे.
व्हायरल व्हिडिओ
Hume mchenry School,सेलिसबरी पार्क येथील शाळेत आमचा आयुष हिवळे रा.शनिवार पेठ,पुणे याला अमानुष मारहाण करणाऱ्या नालायक संदेश भोसले याला मनसे चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल.
आपला
गणेश सोमनाथ भोकरे
अध्यक्ष कसबा मानसे
कसबा परिवार#rajthackeray #viral #reels #student pic.twitter.com/n2KrPX2Yqr
— Ganesh_Bhokare_MNS (@Mns_Ganesh_1010) October 5, 2024
मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शिक्षकाला रितसर नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या विरोधात निदर्शने करत त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकाला मारहाण केली. शाळेच्या काही वस्तूंची तोडफोड केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.