Palghar Accident Video: पालघरमध्ये हायवे क्रॉसिंग करताना वेगवान कारने दिली दुचाकीला धडक, पहा हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
A speeding car hits a bike (PC - X/@RoadsOfMumbai)

Palghar Accident Video: सध्या सोशल मीडियावर पालघर (Palghar) मधील महामार्गावर झालेल्या एका कार आणि मोटारसायकलच्या अपघाताचा (Accident) व्हिडिओ समोर आला आहे. अहवालानुसार, या भीषण अपघातात मोटारसायकलवर स्वार असलेले तीन जण जखमी झाले आहेत. बोईसर-चिल्हार एमएडीसी रोडवर पालघरमधील गुंडाळेजावळ्याजवळ हा अपघात झाला. ही संपूर्ण घटना कारमधील डॅशबोर्ड कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.

या घटनेच्या व्हिडिओमध्ये, एक वेगवान कार महामार्गावरील एका चौकाकडे येताना दिसत आहे. यावेळी अचानक एक दुचाकी महामार्गावर क्रॉसिंग करताना दिसत आहे. वेगात आलेल्या कारच्या धडकेत दुचारीस्वार आणि त्यावरील दोनजण खाली पडतात. यावेळी एक मोठा आवाज ऐकू आला, ज्यामुळे स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. (हेही वाचा -Fire Caught MIDC Factory In Sinnar: सिन्नरमधील MIDC तील कारखान्याला भीषण आग, Watch Video)

येथे पहा व्हिडिओ -

या अपघातात मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. तिन्ही जखमींवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

ही संपूर्ण घटना चारचाकी वाहनाच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघाताचे नेमके कारण स्थानिक अधिकारी फुटेज तपासत आहेत.