Pune Shocker News: पुण्यात वाढत्या गुन्हेगारींचे प्रमाण पाहून नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. दरम्यान एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने टोकाचे पाऊल का उचलले आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे शहरातील उत्तमनगर येथील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक बे परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे. (हेही वाचा- दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची हत्या; आरोपी पतीला अटक, गोरेगाव येथील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली आहे. सोमनाथ सखाराम वाघ असं पतीचे नाव आहे आणि सुवर्णा वाघ असे पत्नीचे नाव आहे. पत्नीचा खून करून आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. दोघे ही रविवारी दुचाकी वरून कामानिमित्त बाहेर गेले होते. उत्तमनगर मार्गाजवळ एका जंगलापाशी दुचाकी उभी केली. थोड्या वेळाने पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. त्यानंतर पतीने टॅंक पॅन्टने झाडाला गळफास घेतला.
रविवारी आई वडिल घरी न आल्यानंतर मुलीने आणि पुतण्याने शोध घेतला. संपुर्ण कुटुंब चिंतेत आले. उत्तमनगराजवळील थोड्या अंतरावर मुलीला आईचा मृतदेह सापडला आणि वडिलाने गळफास घेतल्याचे लटकलेल्या अवस्थेत दिसले. दोघांन्ही घटनेची माहिती उत्तमनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेची माहिती परिसरात हव्यासारखी पसरली. या प्रकरणानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.