'माझा आमदार, माझा मुख्यमंत्री' मातोश्रीबाहेर शिवसेना पक्षाचे नगरसेवक हाजी हलीम खान यांच्याकडून पोस्टरबाजी
Poster (Photo Credit: ANI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले तरीदेखील राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. भाजप- शिवसेना (BJP- ShivSena) महायुतील या निवडणुकीत अधिक जागा मिळाल्या असल्या तरी दोन्ही पक्षात मुख्यमंत्री पदावरून वाद पेटला आहे. यातच शिवसेना नगरसेवसक हाजी हलीम खान (Haji Halim Khan) यांच्याकडून मातोश्रीबाहेर (Matoshree) माझा आमदार, माझा मुख्यमंत्री ( My MLA My Chief Minister) अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीमुळे शिवसेना-भाजप यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचाच होणार यावरुन दोन्ही पक्षात वाद सुरु आहे. दरम्यान, दोन्ही पक्षातील नेत एकमेकांवर जोरदार टिकाही करत आहेत. यातच शिवसेना पक्षाचे नगरसेवक हाजी हलीम खान यांच्या पोस्टरबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरमध्ये माझा आमदार, माझा मुख्यमंत्री असा मजकूर वापरुन मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी केली आहे. भाजपकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या पोस्टरबाजीमुळे महायुतीत आणखी वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्रीपद वगळता 50-50 फॉर्म्युला स्वीकारण्यास भाजप तयार; सत्तावाटपाचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात - सूत्र

एएनआयचे ट्वीट-

एकीकडे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भुमिका घेऊन भाजपला धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात येणार नाही, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यात लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असे म्हटले आहे.