Dhule NEWS PC TW

Dhule Police Heart attack: धुळे शहरातील न्यायालयात बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याची प्रकृती गंभीर होऊन त्यांचे पल्स बंद झाले होते. त्यावेळी कामानिमित्त कोर्टात उपस्थित परिचारिका यांनी धाव घेत पोलिस कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले आहे. त्यांनी वेळीच ह्रदयविकाराचा झटाका आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला CPR उपचार देवून त्यांचे प्राण वाचवले आहे. या घटनेनंतर परिचारिका यांची सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना बुधवारी ३च्या सुमारास घडली आहे. (हेही वाचा- उद्या मुंबईमध्ये होणार टीम इंडियाचा रोड शो; पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध)

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे न्यायालयात कोर्ट अंमलदार म्हणून कार्यरत असलेले  सहाय्यक पोलिस उप निरिक्षक भाईदास साळुंखे  यांना कामाच्या वेळीस अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती बिघडल्याने कोर्टात मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी कोर्टात कामानिमित्त आलेल्या परिचारिका यांनी देवदूतासारखी धाव घेतली. हर्षदा माणिक चौधरी (२५) यांनी भाईदास साळुंखे यांना तातडीने काडींयल पंपीग (CPR) पध्दत देऊन त्यांचे प्राण वाचवले.

उपस्थित इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी पुढील उपाचारासाठी साळुंखे यांना केशवनंद रुग्णालयात दाखल केले. सद्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परिचारिका हर्षदा यांनी निस्वार्थीपणा दाखवत पोलिस अंमलदाराचे प्राण वाचवले याबाबत ठिकठिकाणाहून त्यांना कौतुकाची थाप मिळत आहे. त्यांनी पोलिस विभागा तर्फे प्रंशसा करण्यात आली आहे.