Virar Crime: विरार येथे 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Virar Crime: विरार पूर्व परिसरातील नांरगी कोपरी कच्ची खदान रोडवर एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसराच एकच खळबळ उडाली आहे. दीपक उमेश चव्हाण असा हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मालाड परिसरात सुतार काम करत होता. पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे. ही हत्या कोणत्या उद्देशाने केली आहे हे देखील अद्याप समोर आले नाही. (हेही वाचा- मुंबईच्या घाटकोपरमध्ये 10 वर्षीय मुलावर बलात्कार; 3 अल्पवयीन मुलांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दीपकचा रस्त्यावर मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर खदान रोडवर असलेल्या पोलिस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दीपकचा मृतदहे ताब्यात घेतला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दीपकचा दगडाने ठेचून हत्या केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दीपकच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केले दिसून आले.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाई सुरु करत तीन पथके नेमली आहेत. आरोपी फरार असल्याने पोलिस त्याचा शोधात आहेत. लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पवार यांनी दिली आहे. या खळबळजनक घटनेनंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहेत. पोलिसांनी दीपकच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली आहे.