मुंबई: घाटकोपर येथील पंतनगर परिसरात कोरोना व्हायरसग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर BMC कडून परिसराचे निर्जंतुकीकरण
Fire Brigade employees disinfected Ghatkopar Pantnagar (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील धोका टाळण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई (Mumabi) मधील घाटकोर (Ghatkopar) येथील पंतनगर (Pant Nagar) परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढल्यानंतर त्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या ताबडतोब पंतनगर परिसरात दाखल झाल्या आणि त्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.

यापूर्वी जनता कर्फ्यू दिनी पुणे महानगरपालिकेने स्वच्छता मोहिम हाती घेतली होती. त्या दिवशी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणांसह रहिवाशी वस्त्यांची सफाई केली होती. त्यानंतर आता बीएमसीने देखील खबरदारी म्हणून पंतनगर परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे. (पुणे: जनता कर्फ्यू दिवशी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सार्वजनिक ठिकाणं, रहिवासी वस्त्यांमध्ये स्वच्छता)

BMC Tweet:

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेसोबतच सार्वजनिक स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे महानगरपालिका स्वच्छतेला अधिक महत्त्व देताना दिसत आहेत. तसंच गर्दी टाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसंच नागरिकांच्या वर्दळीवर नजर ठेवण्यासाठी पोलिस ड्रोनचा वापर करणार आहेत.