Pune Municipal Corporation Sanitize Public Places | (Photo Credits: ANI)

देशासह महाराष्ट्र राज्यालाही कोरोना व्हायरसचा विळखा बसला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून आज (22 मार्च) 'जनता कर्फ्यू'चं आवाहन पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलं होतं. जनता कर्फ्यू ला देशातील नागरिकांनी घरी राहत उत्स्फुर्त सहभाग दर्शवला. दरम्यान पुणे महानगरपालिकेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला. जनता कर्फ्यू दिवशी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सार्वजनिक ठिकाणं, रहिवासी वस्त्यांमध्ये स्वच्छता केली. जनता कर्फ्यूमुळे रस्ते, सार्वजनिक ठिकाणी शुकशुकाट होता. त्यामुळे त्यांची स्वच्छता करणे अधिक सोपे गेले.

देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 75 असून त्यापैकी 24 रुग्ण पुण्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा फैलाव अधिक वाढू नये म्हणून पुणेहानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचा पर्याय निवडला. (महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन, कलम 144 लागू : उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन)

ANI Tweet:

दिवसागणित कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता पुढील धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन करण्यात आलं आहे. राज्यात 144 कलम लागू करण्यात आले असून केवळ जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. या काळात किराणा माल, दूध, भाजीपाला, मेडिकल्स, बँका या सुविधा उपलब्ध असतील.