कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) मुंबईसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे आणि झाडांची पडझड झाली आहे. यातच रायगड येथे दोन भाजी विक्रेत्या महिलांच्या अंगावर भिंत कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना उल्हासनगर (Ulhasnagar) येथील एका सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उल्हासनगर येथील एका चालत्या रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 2 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प 5च्या गांधी रोड तहसीलदार या मुख्य रस्त्यावरून जात असाताना एका रिक्षावर मोठे झाड उन्मळून पडले. यात लखुमल कामदार या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, रिक्षाचालक सुनील मोर यांच्यासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपाचार सुरु आहेत. दरम्यान, हे झाडे कोसळल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून हे झाड बाजूला काढण्याचे काम सुरु केले आहे. हे देखील वाचा- Cyclone Tauktae: मुंबईच्या अरबी समुद्रात 2 मोठी जहाज भरकटली; एकावर 273 तर, दुसऱ्यावर 137 जण असल्याची माहिती समोर
महत्वाचे म्हणजे, चक्रीवादाळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची घटना उघडकीस आली आहे. याशिवाय, उरणमध्ये आज सकाळी भाजी विक्री करणाऱ्या 2 महिलांच्या अंगावर भिंत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक महिला जागीच ठार झाली. तर, दुसरी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या संदर्भात न्युज18 लोकमतने वृत्त दिले आहे.