Cyclone Tauktae: मुंबईच्या अरबी समुद्रात 2 मोठी जहाज भरकटली; एकावर 273 तर, दुसऱ्यावर 137 जण असल्याची माहिती
Arabian Sea | (File Photo)

अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारपट्टी भागाला चांगलाच तडाखा बसला आहे. या वादाळामुळे मुंबईतीलही (Mumbai) जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच मुंबईच्या अरबी समुद्रात 2 मोठी जहाज भरकटल्याची महिती समोर येत आहे. नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी एका जहाजावर 273 जण आहेत. तर, दुसऱ्या जहाजावर 137 जण आहेत. यामुळे एकून 410 जणांचे प्राण धोक्यात असून या जहाजांच्या मदतीला 2 मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.

मुंबईजवळील बॉम्बे हायच्या समुद्रात तेल उत्खन्नासंदर्भात काम करणारी एक बोट तौते चक्रीवादळामुळे भरकटली आहे. या बोटीवर 273 जण असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच दुसरीकडे मुंबईच्या समुद्रामध्येच ‘जीएल कंट्रक्शन’च्या मालकीचे आणखीन एक मोठे जहाज भरकटले असून त्यावर 137 जण आहेत. या जहाजांच्या मदतीला आयएनएस कोच्ची, आयएनएस कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत. हे देखील वाचा- Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळ 114 किमीच्या वेगाने रेकॉर्डब्रेक करत मुंबईवर आदळले- आदित्य ठाकरे

ट्वीट-

ट्वीट-

तौक्ते वादळ मंगळवारी पहाटे गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि माहुवा किनाऱ्यांना धडकण्याआधी अती तीव्र स्वरुपाचे म्हणजेच व्हीएससीएस प्रकारचे वादळ असेल. हे वादळ जेव्हा गुजराच्या किनारपट्टीला धडकेल तेव्हा त्याचा वेग 150 ते 160 किमी प्रती तास इतका असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.