सोशल मीडियावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) आणि राज्यमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी 24 ऑक्टोबर रोजी त्यांना अटक करण्यात आलेल्या समित ठक्कर (Sameet Thakkar) याला आज नागपूर कोर्टाने 30 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. समित ठक्करने पर्यावरण आदित्य ठाकरे यांचा उल्लेख बेबी पेन्ग्विन असा केला होता. त्याला रविवारी राजकोटमधून अटक करण्यात आली होती. आज त्याला नागपूर कोर्टात हजर करणार आले होते. नागपूर कोर्टाने समित ठक्करला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या काही नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात समित ठक्कर विरोधात तक्रार दाखल केली होती. समित ठक्करने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध मंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केले आहेत. मात्र, समितची अमृता फडणवीसांसहीत अनेकांनी पाठराखण केली होती. (हेही वाचा - नागरिकांना मोठा दिलासा! राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट; प्रती तपासणीमागे 200 रुपये कमी)
Maharashtra: A Nagpur court sends Sameet Thakkar to police custody till 30th October.
He was arrested on October 24 by for allegedly making objectionable comments against Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray and State Minister Aaditya Thackeray on social media.
— ANI (@ANI) October 26, 2020
समित ठक्कर हा नागपूरचा रहिवासी असून तो ट्विटरवर प्रचंड सक्रिय असतो. समितचे ट्विटरवर 60 हजार फॉलोवर आहेत. विशेष म्हणजे समितला चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते फॉलो करतात.
आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह भाष्य केल्याबद्दल 24 ऑक्टोबर रोजी समितला अटक केली. मात्र, अटक टाळण्यासाठी समितीने 20 ऑक्टोबर रोजी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली होती. 2 जुलै रोजी समितीच्या विरोधात मुंबईच्या व्हीपी मार्ग पोलिस स्टेशन आणि नागपूर येथे एफआयआर नोंदविण्यात आला. त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना सतत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.