पुणे: पत्नीचे यातना सहन न झाल्याने पतीने तिच्यासह स्वत:लाही संपवले
प्रतिकात्मक फोटो | Image only representative purpose (Photo credit: File)

पुणे (Pune) येथील रावेत (Ravet) गावात पत्नीचा खून करुन पतीने स्वता:चे जीवन संपवल्याची घटना घडली. ही घटना आज सकाळी 4 च्या सुमारास घडली आहे. आजारी पत्नीच्या यातना सहन न झाल्याने पतीने पत्नीची हत्या करुन स्वत: आत्महत्या केली. स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहे.

वृक्षाली गणेश लाटे (40) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. वृक्षाली ही पती गणेश लाटे (45) याच्यासह शिंदे वस्तीतील आदित्य टेरेस इमारतीत राहत होती. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास गणेश याने वृक्षालीच्या डोक्यात हातोडा मारा करुन तिचा खून केला. धक्कादायक म्हणजे त्यानंतर गणेशने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. वृक्षाली ही गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी आहे. आजारी असल्यामुळे वृक्षाली हिला अनेकदा यातना होत असे. बुधवारी सकाळी वृक्षालीला मोठ्या प्रमाणात यातना होत असल्याचे गणेशने पाहिले. यावर उपाय म्हणून त्याने वृक्षालीचा खून करुन आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. हे देखील वाचा-पुणे: अडीच वर्षाच्या चिमुकलीवर रेल्वे बोगीत बलात्कार, उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृक्षाली आणि गणेश यांच्या मृत देहाजवळ पोलिसांना चिठ्ठी आढळली. गणेश याने हा सगळा प्रकार चिठ्ठीत नमूद केला होता. या प्रकरणी देहूरोड येथील पोलिस अधिक तपास करत आहेत. चिठ्ठीवरील अक्षर गणेशचे आहे का इतर कोणाचे याचा शोध घेतला जात आहे.