पुणे: अडीच वर्षाच्या चिमुकलीवर रेल्वे बोगीत बलात्कार, उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

फूटपाथावर आईसोबत झोपलेल्या एका चिमुरडीला उचलून नेऊन तिच्यावर रेल्वे बोगीत बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार पुणे रेल्वे स्थानकात घडला. ही चिमुरडी अडीच वर्षाची असून रुग्णालयात उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेने संपूर्ण पुणे शहर (Pune City) हादरले असून हा लज्जास्पद आणि किळसवाण्या घटनेचा सर्व स्तरावर संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मटा ने दिलेल्या बातमीनुसार, पुणे रेल्वे स्थानकातील मालधक्का परिसरात ही पीडित मुलगी आपल्या आई-बाबांसोबत फुटपाथवर राहत होती. त्या परिसरात लिंबू, मिरची, खेळणी आपला उदरनिर्वाह करत होते. सोमवारी रात्री ही मुलगी आपल्या आईसोबत फूटपाथवर झोपली होती. 27 ऑगस्ट म्हणजेच मंगळवारच्या सकाळी आरोपीने ह्या मुलीला उचलून तेथील एका रेल्वेच्या बोगीत नेले. तेथेच तिच्यावर बलात्कार केला. आईला जाग येताच तिने शोधाशोध करण्यास सुरुवात केली. मात्र मुलगी सापडली नाही. हेदेखील वाचा- धक्कादायक! इयता सातवीतील विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार; पिडीता गरोदर, आरोपी फरार

लोहमार्ग पोलिसांना ही मुलगी रेल्वेच्या डब्यात बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यांनी त्वरित तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.