धक्कादायक! इयता सातवीतील विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार; पिडीता गरोदर, आरोपी फरार
Image used for representational purpose | (Photo Credits: IANS)

उत्तर केरळमधील मलप्पुरम (Malappuram) जिल्ह्यातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका शाळेतील शिक्षकावर विद्यार्थिनीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ही मुलगी सातवी इयत्तेत शिकत असून, तिचे वय अवघे 12 वर्षे इतके आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आता ही विद्यार्थिनी गर्भवती आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा शिक्षक बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. या शिक्षकाचे वय 30 वर्षे आहे. गेले दोन महिने हा शिक्षक विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करत होता.

एका पोलीस अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला याबाबत माहिती दिली आहे.  सुमारे दोन महिने या मुलीचे लैंगिक शोषण आहे. मात्र तिच्या कुटुंबियांना याबाबत काहीही माहिती माहिती नव्हती. यादरम्यान या मुलीवर अनेकवेळा बलात्कार करण्यात आला. त्यानंतर जेव्हा काही कारणास्तव या मुलोची दवाखान्यात वैद्यकीय तपासणी झाली ही बाबा समोर आली.   याबाबत शंका आली तेव्हा तेव्हा या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (हेही वाचा: विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या)

त्यानंतर या मुलीचे समुपदेशन करण्यात आले. या दरम्यान, शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली. सध्या हा आरोपी फरार झाला आहे. या शिक्षकावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप ठेवण्यात आला असून, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत असून, आरोपीचा शोध घेत आहेत.