महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे जाळे पसरत चालेले आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या राज्यात कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल घडत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक कोरोनाबाधीत रुग्ण बरे होत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे. यातच नागपूर (Nagpur) येथे कोरोनावर मात करून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या एका व्यक्तीला घराबाहेर पडणे चांगलेच भोवले आहे. शायकीय रुग्णालयातून (Govt Hospital) परतल्यानंतर घराबाहेर फिरत असताना आढळल्यामुळे स्थानिक पोलिसांनी संबंधित पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला 14 दिवसांकरिता क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्याकरिता देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत एकूण 14 हजार 792 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 448 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 015 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे. यात मुंबईत 184 तर, पुणे शहरात 78 नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे देखील वाचा- मुंबईतील INS Angre या नौदल तळावरील 20 कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाल्यानंतर 130 जण क्वारंटाइन
एएनआयचे ट्वीट-
A #Coronavirus positive person who was discharged from Govt Hospital yesterday has been booked by Nagpur police for flouting rules & roaming outside after being discharged. He has been placed under quarantine facility again: Tahsil Police Station, Nagpur City Police #Maharashtra
— ANI (@ANI) April 18, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.