Minister of State for Defence Shripad Naik (Photo Credits-ANI)

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरात अधिक वाढत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाइउनचे आदेश वाढवत या दोन शहरांना रेड झोनमध्ये टाकले आहे. याच दरम्यान, शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी आणि मृतांची संख्या वाढत असल्याची माहिती नेहमीच आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईतील INS Angre  या नौदल तळावरील 20 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आता 130 जणांना सुद्धा क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी असे म्हटले आहे की, नौदलाच्या 20 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 130 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना नौदलाच्या रुग्णालयातच उपचारासाठी दाखल केले आहे. अन्य जणांना सुद्धा क्वारंटाइन करण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले आहे. दरम्यान, 7 एप्रिल रोजी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यामध्ये 20 कर्मचाऱ्यांना ही कोरोनी लागण झाल्याचे दिसून आले.(PPE किट्स आणि टेस्टिंग किट्स केंद्र सरकारकडून पुरवले जाणार पण अपेक्षेप्रमाणे पुरवठा नाही- बाळासाहेब थोरात)

तर महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजाराच्या पार गेला आहे. सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुद्धा केली जात आहे. तर केंद्र सरकारने राज्याला पीपीई किट्स आणि टेस्टिंग किट्स देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भारत हा पीपीई किट्स आणि मास्क बनवण्यात जगातील दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.