Tanker-Truck Accident at Chandrapur: डिझेल टँकर आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक; 9 जणांचा मृत्यू
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Tanker-Truck Accident at Chandrapur: महाराष्ट्रातील चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात (Accident) झाला आहे. डिझेल टँकर (Diesel Tanker) आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्यानंतर लागलेल्या आगीत जळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ट्रक चालकालाही आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या ट्रकमध्ये लाकूड भरल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या अपघाताचा तपास सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर भीषण आग लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटले आणि आग आणखी भडकली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवता आले. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अद्याप या अपघातात मृत्यू झालेल्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत. (हेही वाचा -Jogeshwari-Vikhroli Link Road: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर अपघात, क्रिकेट स्पर्धेला जाताना बालपणीच्या मित्रांवर काळाचा घाला)

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर गावाजवळ गुरुवारी रात्री हा अपघात झाला. पेट्रोल टँकर आणि लाकूड वागून नेणाऱ्या ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर भीषण आग लागली. ही आग अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत विझवली. आगीमुळे मृतदेह ओळखण कठीण झालं आहे. या आगीत टँकर चालकाचादेखील मृत्यू झाला आहे.