Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबईतील (Mumbai) माहिम दर्ग्याचे (Mahim Dargah) ट्रस्टी डॉ. मुदस्सर निसार (Mudassir Nisar) यांच्याविरोधात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात एका महिलेने माहिम पोलीस ठाण्यात डॉ. मुदस्सर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार करण्यात आला आहे, असा आरोपही संबंधित महिलेने तक्रारीत केला आहे. या तक्रारीनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. एएनआय वृत्त संस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुदस्सर हे माहिम दर्ग्याचे ट्रस्टी आहेत. याशिवाय, ते वक्फ बोर्डाचे सदस्य देखील आहेत. मात्र, मुदस्सर यांनी लग्नाचे आमिष दाखवत आपल्यावर बलात्कार केल्याची एका महिलेने माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच माहिम दर्ग्याच्या परिसरातच बलात्काराचा प्रकार घडल्याचे संबंधित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. हे देखील वाचा- Satara: सातारा जिल्ह्यातील जवानाची हत्या; पत्नी, भावजय आणि मेहुण्यानेचं काढला काटा

एएनआयचे ट्विट-

याप्रकरणी संबंधित महिलनेने दिलेल्या तक्रारीनुसार महिम पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. यासंदर्भात अद्याप डॉ. मुदस्सर यांनी प्रसार माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी ते काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोप झाल्यानंतर डॉ. मुदस्सर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.