 
                                                                 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) सध्या महाराष्ट्रातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागांच्या दौऱ्यावर आहेत. मात्र आज ते नागपुरात असताना त्यांच्या ताफ्यातील एका गाडीची दुचाकीला धडक (Sharad Pawar convoy accident) होऊन अपघात झाला.
टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील जामगाव परिसरातून पवारांचा ताफा जात असताना एका गाडीची दुचाकीला धडक बसली. आणि या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. आणि हा अपघात घडला तेव्हा शरद पवार यांची गाडी त्यामागेच होती.
शरद पवार खामगांव येथील शेतकऱ्यांना भेटायला गेले असता, तेथील शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा पवारांपर्यंत पोहोचावी यासाठी शेतीतील वाळलेल्या पिकांचा बुके त्यांना दिला. तसेच त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी देखील केली.
दरम्यान पवारांनी आपल्या विदर्भातील दौऱ्यादरम्यान नागपूर जिल्ह्यातील चारगाव आणि परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. तसेच काटोल अर्जुनगर गावातील वानखेडे या शेतकऱ्यांच्या संत्राबागेतील नुकसानीची पाहणी देखील त्यांनी केली.
इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक गाव दत्तक घेतलं होतं. या दत्तक घेतलेल्या फेटरी गावालासुद्धा शरद पवारांनी भेट दिली असताना शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केलं.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
