सोशल मीडियावर पूर्व प्रेयसीचे न्यूड फोटो पोस्ट केल्याप्रकरणी एका व्यापाऱ्याला अटक
Representational Image (Photo Credits: Facebook)

सोशल मीडियावर (Social Media) पू्र्व प्रेयसीचे न्यूड फोटो पोस्ट केल्याप्रकरणी एका व्यापाऱ्याला भलतेच महागात पडले आहे. ही घटना गोरेगाव (Goregoan) परिसरात घडली असून याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे. पाडित तरुणीची 2013 साली आरोपीबरोबर ओळख झाली होती. आरोपी हा प्रेयसीच्या भावाचाच मित्र आहे. पीडित आणि आरोपी यांची मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला न्यूड फोटो पाठवण्यास सांगितले. तरुणीवर दबाब आणण्यासाठी आरोपीने आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती. त्यावेळी आरोपीने पीडित तरुणीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन दुबईला निघून गेला होता. आरोपी दोन वर्षानी भारतात परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती मिड डे दिली आहे.

महिलेचा विनयभंग केल्याच्या अनेक घटना आपल्या कानावर पडत असतात. यातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या प्रेयसीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या व्यापाऱ्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीची 2013 साली आरोपीबरोबर ओळख झाली होती. तो तिच्या भावाचा मित्र होता. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. 2015 साली आरोपीने पीडित तरुणीला तिचे न्यूड फोटो पाठवायला सांगितले. तरुणीवर दबाव आणण्यासाठी आरोपीने आत्महत्येची धमकी दिली. फोटो पाठवले नाहीस तर, स्वत:ला सिगारेटचे चटके देईन अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली. याला बळी पडून पडिताने आपले न्यूड फोटो अरोपीला पाठवले. आरोपीने सोशल मीडियावर तिच्या नावाचे बनावट खाते बनवून तिचे न्यूड फोटो शेअर केले. त्यानंतर आरोपी दुबईला निघून गेला होता. अखेर 2017 साली त्याने तिच्या नावाचे सोशल मीडियावर बनावट खाते बनवून व तिचा न्यूड फोटो अपलोड केला आहे. हे समजतात पीडित तरूणीने पोलीस स्थानकात तक्रार तक्रार दाखल केली. दोन वर्षांनी मायदेशी परतल्यानंतर स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला अटक केली आहे. हे देखील वाचा- अमेरिकेला गेलेला नवरा परत यावा यासाठी बायको, कुटुंबीयांचे सासरच्या दारात आंदोलन; औरंगाबाद येथील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विरोधात 354 (सी), 67 अ या कलमातंर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांचे पथक आरोपीच्या घरी पोहोचले, त्यावेळी तो दुबईल पळून गेल्याचे समजले. आरोपी दुबईवरुन परतल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याला निवासस्थानाहून अटक करण्यात आली.