Mumbai: शहरातील वरळी परिसरातील डॉ आर जी थडानी मार्ग, वरळी सीफेस येथे असलेल्या बेनरीझ अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मंगळवारी रात्री 10:39 च्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले.नागरी संस्थेने पुढे सांगितले की, अधिकाऱ्यांनी या आगीला 'लेव्हल-1' आग म्हटले आहे.
तळघर आणि दोन मजल्यांच्या स्ट्रक्चर्समधील सजावटीच्या साहित्यापर्यंत आग मर्यादित होती. मुंबई अग्निशमन दलाव्यतिरिक्त स्थानिक पोलीस आणि वॉर्ड कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत अद्याप कोणतीही दुखापत झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा - Malaria And Dengue Cases In Mumbai: मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; 1 ते 18 सप्टेंबर कालावधीत मलेरियाचे 756 तर डेंग्यूच्या 703 रुग्णांची नोंद)
@IndianExpress @mybmc @MumbaiPolice fire on #worli benreeza building pic.twitter.com/X0vgKLXerk
— Nev (@noknow81) September 19, 2023
दरम्यान, मुंब्रा येथील एका इमारतीत बुधवारी पहाटे वातानुकूलित यंत्रात लागल्याची माहिती समोर आली. यात कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मुंब्रा अग्निशमन केंद्राला देण्यात आली, मोहम्मद खालिद यांच्या मालकीच्या चार मजली इमारतीच्या डी विंगच्या खोली क्रमांक 401 मधील एअर कंडिशनरमधून ही आग लागली.