Mumbai Accident: भरधाव स्कूटीच्या धडकेत 76 वर्षीय वृध्दाचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना
Accident (PC - File Photo)

Mumbai Accident: मुंबईतील घाटकोपर परिसरात अपघातात एका ७६ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी ८ मार्च रोजी जेव्हा सांयकाळी फेरफटका मारत होते त्यावेळी ही दुर्घटना घडली. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे. रमेश राठोड असं मृताचे नाव आहे. ते घाटकोपर परिसरातील पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात आपल्या पत्नी, मुलगा आणि दोन मुलींसोबत राहत होता. (हेही वाचा-  अनियंत्रित ट्रकने 6 जणांना चिरडले, 25 हून अधिक जखमी, मध्य प्रदेशातील लग्न मिरवणूकीतील दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश राठोड यांचा मुलगा निलेश राठोड यांनी सोमवारी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला. निलेश यांच्या तक्रारीनुसार, त्याचे वडिल जवळपास दररोज संध्याकाळी ४ वाडता फिरायला जातात आणि रात्री साडेआठ वाजात जेवून परततात.  8 मार्च रोजी नीलेशला त्याच्या बहिणीचा फोन आला ज्याने त्यांना त्यांच्या वडिलांच्या अपघाताची माहिती दिली आणि काही लोकांनी त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले.

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, एका अॅक्टीवाने रमेश यांना धडक दिली. स्कूटी भरधाव वेगवाग दिशेने येत होती. धडक दिल्यानंतर स्कूटीचालक अपघातस्थळावरून फरार झाला आहे. अपघातस्थळावरून आरोपी फरार असल्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे. पोलिस आरोपीची शोधात आहे. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.