काही दिवसांपूर्वी मुंबईत पुण्याच्या शेतकर्याने मंत्रालयाच्या (Maharashtra Secretariat) प्रवेशद्वारा जवळ विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान तातडीने या व्यक्तीला नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचारा दरम्यानच तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला आहे. आत्महत्या केलेली व्यक्ती 48 वर्षीय असून पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी गावाची रहिवासी होती.
मागील 6 महिने जाधववाडी गावामधील शिंदे कुटुंब आणि जाधव कुटुंब यांच्यामध्ये शेत जमिनी वरून वाद सुरू होता. या वादामध्ये 4 वेळेस हाणामारी, वाद विवाद, भांडणं झाली होती. याप्रकरणी पोलिस स्टेशन मध्ये दोन्ही कुटुंबांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आपल्यावर अन्याय होत असल्याच्या भावनेमधून सुभाष जाधव ही व्यक्ती 20 ऑगस्टला मंत्रालयात दाद मागायला आली होती. मात्र त्यांना प्रवेश नाकारल्याने प्रवेशद्वारावरच त्यांनी विष घेतले. यानंतर त्यांना जीटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मागील 3 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती पण आता ती अयशस्वी ठरली आहे.( नक्की वाचा: बेरोजगार तरुणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न).
Maharashtra | A 48-year-old man who tried to kill himself outside the Maharashtra secretariat in Mumbai by consuming some poisonous substance died during treatment at a hospital, police said on Sunday.
— ANI (@ANI) August 23, 2021
सुभाष जाधव यांनी त्यांची जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. त्याबाबत एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लिहले आहे. पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करूनही त्यांना दाद मिळत नसल्याने अखेर मंत्रालयात जाऊन न्याय मिळावा म्हणून मुंबई गाठली पण इथेच त्यांचा अंत झाला.