कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत. यातच पुणे येथे व्हायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) उपचारासाठी दाखल झालेल्या एका 42 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना विषाणूमुळे पिंपरीत-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील हा पहिला बळी आहे. यामुळे पुण्यात कोरोनाची बाधा होऊन आतापर्यंत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाले आहे. राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. तसेच मुंबई आणि पुण्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरात कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 16 लाख 91 हजार 719 वर पोहचली आहे. यांपैकी 1 लाख 2 हजार 525 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 68 हजार 669 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 8 हजार 447 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 775 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1895 वर पोहचली आहे. यात 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Covid-19: जामखेड तालुक्यात माक्सशिवाय घराबाहेर पडणाऱ्या चौघाविरोधात गुन्हा दाखल
एएनआयचे ट्वीट-
A 42-year-old man who was suffering from Alcoholic cirrhosis died at YCM hospital in Pimpri-Chinchwad today. He had tested positive for COVID19. This is the first death in Pimpri-Chinchwad,Pune Dist.Death toll in Pune is now 32: Pimpri-Chinchwad Municipal Commissioner,Maharashtra
— ANI (@ANI) April 12, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.