Coronavirus (Photo Credits: AFP)

कोरोना विषाणू (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन आतापर्यंत 20 हजारांहून अधिक नागरिकांचा मत्यू झाला आहे. तर 4 लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना विषाणूने भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. या विषाणू नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या विषाणूचा संसर्ग वाढू नये राज्यसरकारकडून प्रतिबंधात्मक पावले उचलली जात आहेत. यातच नागपूर (Nagpur) शहरात आणखी एक कोरोना बाधीत (Corona Positive) रुग्ण आढळला आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. यामुळे नागपूर शहरातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 125 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषानू संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन 13 हजार 581 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात चीननंतर इटलीमध्ये सर्वाधिक 7 हजार 503 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, स्पेन मध्ये 3 हजार 434 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या चीन येथील मृतांची संख्या मंदावली असून तेथील मृतांची संख्या 3 हजार 281 वर आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्पेन, इटली यांच्यानंतर भारतानेही लॉकडॉऊनचा पर्याय निवडला आहे. यातच नागपूर येथे 42 वर्षीय एका नवा कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने प्रशासन चक्रावून गेले आहेत. आता राज्यात कोरोना बाधीतांची संख्या 125 वर पोहचली आहे. कोरोना विषाणू वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा-साॅरी उद्धवजी.. मी किरण माने, मला तुमची माफी मागायचीय!, अभिनेत्याने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागितली

एएनआयचे ट्वीट-

भारतात आतापर्यंत 650 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 42 लोक यातून बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 125 वर पोहचली आहे. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.