Pune Crime News: छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Pune Crime News: पुण्यात एकतर्फी प्रेमातून रिक्षा चालकाच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीवर विमानतळावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडीत मुलीच्या आईने  फिर्याद दिली आहे. पुणे पोलीसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आले आहे.  पुण्यात गुन्हेगारी वाढतो त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

 त्रिशला बंडू कवडे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. अवघ्या 15 वर्षाच्या मुलीने जीवन संपवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार,  सोमनाथ ऊर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (22) असं आरोपीचे नाव आहे. दिलेल्या तक्रारानुसार मुलगी आठ दिवसांपुर्वी क्लासला जाताना आरोपी रिक्षा घेवून तिच्या जवळ आला.तीला क्लासला सोडून देण्याची वार्ता करत तीला जबरदस्तीने रिक्षात बसण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर 11 सप्टेंबर रोजी मुलीच्या घरी गेला. मुलगी घरी सोफ्यावर बसली असताना तिच्या अंगावर चुकीच्या पध्दतीने हात लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुलीची आई घरी आली असताना, आरोपी फरार झाला.

या प्रकराणी आईने पोलीसांत तक्रार केली. पण काही दिवसांनी आरोपीने पुन्हा त्रास देण्यास आला. त्रास वाढत गेल्याने मुलीने आयुष्य संपवले.  मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेतला. या प्रकरणी पोलीसांनी चौकशी करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.