 
                                                                 वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) परिसरात शुक्रवारी घडली. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आपल्याच मुलावर लैगिंक अत्याचार केल्याची माहिती कळताच पत्नीने स्थानिक पोलिसात जाऊन आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे आजुबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे परिसरात आपल्या पित्यानेच पोटच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे कळताच संपूर्ण शहरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.पीडित घरात एकटाच असल्याचे पाहून आरोपीने 6 जानेवारी रोजी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. आपली आई घरी परतल्यानंतर पीडितने सर्व प्रकार तिच्या कानावर टाकला. त्यानंतर पीडितच्या आईने आपल्या पतीकडे यासंदर्भात विचारणा केली. दरम्यान, पीडितच्या आई-वडिल यांच्यात भांडण झाले. यानंतर पीडतच्या आईने स्थानिक पोलिसात धाव घेऊन आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. त्यावेळी आरोपीने पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती एनडीटीव्हीने दिली आहे. हे देखील वाचा- मुंबई: गोरेगाव परिसरातील एका हॉटेलमधील SEX रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह एक मॉडेल अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जानेवारी रोजी ही घटना घडली तेव्हा संबंधित मुलाची आई घरात नव्हती. सध्या आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीवर कलम 377 तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
