मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत आज 846 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 42 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 68 हजार 481 वर पोहचली आहे. यापैंकी 3 हजार 842 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 34 हजार 576 जणांना कोरोनावर मात केली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा-Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 3214 नवीन कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,39,010 वर
एएनआयचे ट्विट-
846 new #COVID19 positive cases and 42 deaths reported in Mumbai today. The total number of positive cases rises to 68,481 including 34,576 recovered/discharged cases, 30,063 active cases and 3,842 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra pic.twitter.com/Q4DZOjxUfY
— ANI (@ANI) June 23, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.