![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/05/Coronavirus-in-India-2-380x214.jpg)
महाराष्ट्रात (Maharashtra) आज 3214 नवीन कोरोना विषाणू (Coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांची व 248 मृत्यूंची नोंद झाली आहे. यातील 75 मृत्यू हे मागील 48 तासातील आहेत व पूर्वीचे 173 मृत्यू आहेत. आज राज्यात तब्बल 1925 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. अशाप्रकारे राज्यात एकूण सकारात्मक रूग्णांची संख्या वाढून 1,39,010 इतकी झाली आहे. यामध्ये 69,631 आतापर्यंत बरे झालेले रुग्ण व आतापर्यंत झालेल्या 6,531 मृत्यू समाविष्ट आहेत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली. आज पर्यंतचा राज्यातील रिकव्हरी रेट 50.09% आहे
8,02,775 प्रयोगशाळेतील नमुन्यांपैकी 1,39,010 लोकांची चाचणी (17.31%) पॉझिटिव्ह आली आहे. सध्या 6,05,141 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि 26,572 लोक Institutional Quarantine मध्ये आहेत. मुंबईच्या धरावीमध्ये आज 5 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2,189 वर पोहोचली आहे. यापैकी 80 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मालाड येथे गेल्या 3 महिन्यांत 70 कोरोना विषाणू रुग्ण गायब असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्यावर किंवा काही रुग्ण त्याआधीच गायब झाले आहेत व सध्या प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. (हेही वाचा: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 2 हजार 189 कोरोनाबाधित; दिवसभरात आणखी 5 नव्या रुग्णांची नोंद)
एएनआय ट्वीट -
3214 new #COVID19 positive cases, 248 deaths (75 in last 48 hours and 173 in the previous period) and 1925 discharged in Maharashtra today. Total positive cases in the state rises to 1,39,010 including 69,631 recovered patients & 6531 deaths: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/zF71UqdqeA
— ANI (@ANI) June 23, 2020
दरम्यान, राज्य सरकारने आज तडकाफडकी निर्णय घेत, राज्यातील नवी मुंबई (Navi Mumbai), उल्हासनगर (Ulhasnagar) व मीरा भाईंदर (Mira Bhayandar) महापालिका आयुक्तांची बदली केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संक्रमितांची वाढती संख्या हे या बदलीमागील कारण असल्याचे चर्चा सध्या रंगत आहे. सध्या महाराष्ट्रात मुंबई नंतर ठाणे व पुणे या ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आहेत. इथल्या संक्रमितांची संख्या अनुक्रमे 26,506 व 16,907 इतकी आहे.