COVID19: मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातील 81 कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
Mumbai's Arthur Road prison (PC - PTI)

COVID19: मुंबईतील (Mumbai) ऑर्थर रोड (Arthur Road) कारागृहातील (Prison) 81 कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत ऑर्थर रोड कारागृहात 184 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात कारागृहातील 26 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भात आर्थर रोड कारागृह प्राधिकरणाने (Arthur Road Prison Authority) माहिती दिली आहे.

राज्यात मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज मुंबईत 875 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 13564 वर पोहोचली आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत 19 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. (हेही वाचा - Coronavirus: धारावीत आज 26 नव्या कोरोना बाधितांची भर तर 2 जणांचा कोरोनामुळे बळी; धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 859 वर पोहोचली)

दरम्यान, धारावीत आज 26 नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून 2 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 859 वर पोहोचली आहे. आतापर्यंत धारावीत 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 222 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.