मुंबईतील (Mumbai) कसाईवाडा परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गरम तेलात पडून आठ वर्षांची मुलगी भाजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजीपाला विकणाऱ्या दोन दुकानदारांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून ही घटना घडली मुलीला गंभीर (Girl Suffered Serious Burn Injuries) दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वसीम खलील अन्सारी आणि मुस्तकीम हकीम अन्सारी या दोन आरोपींना अटक केली आहे. अन्सारी कसाईवाडा परिसरात फूड स्टॉल चालवतात. दोन दिवसांपूर्वी, जेव्हा 8 वर्षीय अफसीन शेख आणि 76 वर्षीय मुनव्वर अली पुरी-भाजी घेण्यासाठी एका स्टॉलसमोर थांबले होते, तेव्हा अन्सारी अचानक काही घरगुती कारणावरून भांडू लागले. त्यातील एकाची कढईला धक्का लागला आणि गरम तेल अफसिन आणि अली यांच्या अंगावर पडले.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या चेहऱ्यावर आणि छातीवर गंभीर दुखापत झाली आहे, तर अलीला किरकोळ दुखापत झाली आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघातात आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यु
दुसरीकडे, वांद्रे येथे शुक्रवारी सकाळी भरधाव वेगात असलेल्या खासगी टॅक्सीने रस्त्यावर होळी खेळणाऱ्या आठ वर्षीय मुलाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर टॅक्सीने मॉर्निंग वॉकला गेलेल्या इतर तीन जणांना धडक दिली आणि जखमी केले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. निर्मल नगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे (पूर्व) येथील राम मंदिर परिसरात हा अपघात झाला कारण टॅक्सी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. (हे देखील वाचा: Pune Crime: वीस रुपयांचे आमिष दाखवत पुणे येथील 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक)
या अपघातात जीव गमावलेल्या मुलाचे नाव गफ्फार चौधरी असे आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी आरोपी ड्रायव्हर सुनील कुमार राजपूतला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिकाऱ्याने सांगितले की आरोपी ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता आणि त्याच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवानाही नव्हता.