अंधश्रद्धेविरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असताना देखील महाराष्ट्राच्या अनेक भागांत अंधश्रद्धेचे (Superstition) अघोरी प्रकार घडतायत. असाच एक धक्कादायक प्रकार मेळघाटात घडला आहे. चिखलदरा तालुक्यातील बोरदा या आदिवासी गावात एका आठ महिन्याच्या बाळाच्या पोटावर जन्मदात्या आईवडिलांनी गरम विळ्याचे चटके दिल्याची घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणा-या या घटनेत मांत्रिकाच्या सांगण्यावरुन हा प्रकार समोर आला आहे. या जिल्ह्यात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
ABP माझा ने दिलेल्या बातमीनुसार, आठ दिवसांपासून बाळाला ताप, खोकला येत होता. तसेच त्याचे पोटही फुगत होते. अशा स्थितीत या बाळाला डॉक्टरांकडे न नेता या मातापित्यांनी त्याला एका मांत्रिकाकडे नेले. ज्यावर उपचार म्हणून या मांत्रिकांने बाळाच्या पोटावर चटके देण्यास सांगितले. त्यानुसार आई-वडिलांना या तान्हुल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिले. अंधश्रद्धेचा कहर! हाताचे चुंबन घेऊन Coronavirus बरा करत होता कोरोना संक्रमित बाबा; संपर्कात आलेल्या 19 जणांना कोरोना विषाणूची लागण
या अघोरी प्रकाराची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी या मांत्रिक आणि बाळाच्या वडिलांना अटक केली. या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
ओडिशाच्या (Odisha) कटक (Cuttack) जिल्ह्यातील नरसिंहपूर येथील एका मंदिराच्या पुजार्याने (Priest), कोरोना विषाणूचे संकट टळावे म्हणून, एका व्यक्तीला ठार मारून देवीला नरबळी दिला आहे. नरसिंहपूर बंधहुडा गावात बुधवारी रात्री एका व्यक्तीचा मृतदेह ब्राह्मणी देवी मंदिर परिसरात सापडला. स्थानिक पोलिसांनी या हत्येमध्ये वापरली गेलेली शस्त्रे जप्त केली आहेत. संसारी ओझा (Sansari Ojha) असे आरोपीचे नाव असून त्याचे वय 70 वर्षे आहे.