Amravati Car Accident: चिखलदऱ्यात कार 200 फूट दरीत कोसळली, अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी

चिखलदऱ्यात कारचा मोठा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Amravati Car Accident: चिखलदऱ्यात कार 200 फूट दरीत कोसळली, अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी
Accident (PC - File Photo)

Amravati Car Accident: अमरावती जिल्ह्यात मोठी दुर्घटना झाली आहे. भरधाव कार 200 फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  अमरावती जिल्ह्यातील चिखल दऱ्यात ही घटना घडली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. कारचा चक्काचूर झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघात अन्य चार प्रवासी जखमी झाले आहे. रविवारच्या पहाटे ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच. स्थानिकांनी पोलीसांना फोन केला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांच्या मदतीने बचावकार्य सुरु केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यंटक चिखलदऱ्यात फिरण्यासाठी आले होते, थंड हवेचं ठिकाण असलेल्या चिखलदऱ्यात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील आदिलाबाद येथून आठ पर्यटक फिरण्यासाठी आले होते. या भागात रिमझिम पाऊस होता. अमरावती चिखलदरा रस्त्यावरून जात असताना भरधाव कार २०० फूट खोल दरीत कोसळली. कार मधील चार पर्यटकांचा या अपघातात मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले. स्थानिकांनी पोलीसाना फोन करून कळवले.

स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले. या अपघातात कार दरीत कोसळल्याने कारचा चेंदामेंदा झाला. अपघातग्रस्त कार अर्टिगा असून एपी २८ डीडब्ल्यू २११९ असा कारचा नंबर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कारला दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2023 02:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).