Brihanmumbai Municipal Corporation (Photo Credits: PTI)

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात सुमारे 781 शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती शिक्षण हक्क कायद्यानुसार समोर आली आहे.  2009 च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार, शिक्षक व विद्यार्थी गुणोत्तर ठरविण्यात आले होते. या गुणोत्तरानुसार, महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये 8 हजार 900 शिक्षकांची पदे असणे आवश्यक आहे. (हेही वाचा - BMC वर आयकर विभागाचे छापे; 735 कोटी रूपयांची बेहिशेबी मालामत्ता जप्त)

सध्या महापालिकेत 8 हजार 119 पदे रिक्त आहेत, अशी माहिती शिक्षण कार्यकर्ते घन:श्याम सोनार यांना दिली आहे. महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये 'सीबीएसई' अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पालिका अधिकारी आणि सीबीएसईचे अधिकारी यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विस्तारासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून 50 कोटी डॉलर्सची मदत

दरम्यान, घन:श्याम सोनार यांनी पालिकेच्या शाळेतील मुलभूत सुविधांवर टीका केली आहे. पालिका शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा दावा करत आहे. परंतु, प्रत्यक्षात त्यांचा अभ्यासक्रम हा माध्यमिक स्तरावर सुरू होतो. राष्ट्रीय शिक्षण आराखडा 2005 नुसार शिक्षणक्रम सुरू केला तर विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास आपोआप गोडी निर्माण होईल आणि शाळेचा संख्या वाढेल, असा विश्वास सोनार यांनी व्यक्त केला.