Thane Accident: भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने 7 वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू; 3 जण जखमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Thane Accident: महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातील शहापूर येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने सात वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. पोलिसांनी रविवारी या घटनेची माहिती दिली. शहापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी अर्जुनली येथील मुलांचा एक गट त्यांच्या शाळेतून घरी जात असताना ही घटना घडली.

भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर मुलांवर आदळला, त्यात हर्षला सोमनाथ विशे हिचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन मुले जखमी झाली. अधिकाऱ्याने सांगितले की, जखमी मुलांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Measles Outbreak in Mumbai: गोवरच्या लसीकरणाचा पुढील टप्पा 15 ते 25 जानेवारी दरम्यान करणार आयोजित)

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. (हेही वाचा -Molestation in Moving Car Case: मुंबई-अहमदाबाद हायवेवर 10 महिन्याच्या मुलीला गाडीबाहेर फेकत चालत्या कार मध्ये महिलेचा विनयभंग)

दरम्यान, शनिवारी नाशिकमध्ये एक रस्ता अपघात झाला होता. या कार अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे. त्याचवेळी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नरजवळील मोहदरी घाटात घडली.