Coronavirus (Photo Credit: Twitter)

संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज दुपारी जिल्ह्यातील 61 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 9571 इतका झाला आहे. आतापर्यंत यातील 5499 रुग्ण हे बरे झाले आहेत. तर 373 जणांनाचा कोरोना विषाणूमुळे बळी गेला आहे.

सध्या औरंगाबाद जिल्ह्यात 3699 जणांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 1005 स्वॅबपैकी 66 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले होते. त्यात आज दुपारी 61 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. (हेही वाचा - Coronavirus: राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोना व्हायरस संसर्ग; प्रकृती उत्तम)

जिल्ह्यात आज दुपारी सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 35 रुग्ण हे मनपा हद्दीतील असून 23 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. याशिवाय आज सकाळी सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 21 रुग्ण हे मनपा हद्दीतील असून 31 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.

दरम्यान, बुधवारी राज्यात 7,975 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. तर 233 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,75,640 वर पोहोचली आहे. आतापर्यंत तब्बल 1,52,613 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.