Rajasthan Accident: राजस्थानमध्ये कार अपघातात जळगाव येथील सहाजणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील सह जण असल्याची माहिती समोर येत आहे. हे कुटुंब जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावातील रहिवासी होते. ऐन दिवाळीत या घटनेमुळे गावात मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच राजस्थानला रवाना झाले. शिक्षकाचे कुटुंबीय या अपघातात मृत्यूमुखी पडले आहे. राजस्थानला फिरण्यासाठी आलेल्या शिक्षक कुटुंबियांचा कार अपघात झाला.
माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीनिमित्त राजस्थानाला फिरायला जात होते. दरम्यान त्यांच्या कारला कंटेनरला धडक लागल्याने अपघात झाला या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. शिक्षक धनराज नगराज सोनवणे (वय ५५, रा. बेटावद) आणि योगेश धोंडू साळुंखे (रा. अर्थे. ता. शिरपूर, हल्ली मुक्काम पिंपळे रोड, अमळनेर) या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब एका गाडीत तर दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब एक गाडीत अशा दोन कारमध्ये सर्व जण राजस्थान येथील जैसलमेर येथे फिरायला गेले होते. काल दुपारी दोन वाजता हा अपघात डोरीमना गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोनावणे आणि सांळुखे असलेल्या कारने एका मोठ्या कंटेनरला धडक दिली अशी माहिती माध्यमांना देण्यात आली.
या अपघाताची माहिती मिळताच धोरिमाण्णा पोलिस ठाण्यातील कर्मचारी अपघात स्थळी पोहचले. घटनास्थळी नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह शासकिय रुग्णालयात शवागारात ठेवण्यात आले आहे. आज सर्व मृतदेह राहत्या घरी नेण्यात येणार असून त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले जाणार आहे.
या अपघातात धनराज त्यांची पत्नी सुरेखा धनराज सोनवणे (वय 50), मुलगी स्वरांजली (5 वर्षे) , गायत्री योगेश साळुंखे (वय 30), प्रशांत योगेश साळुंखे (वय 7), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय 1) यांचा जागीच मृत्यू झाला. पाच जणांंचा जागीत मृत्यू झाला. एकाचा मृत्यू रुग्णालयात उपचारादरम्यान झाला.