Kopargaon Highway Accident: कोपरगाव महामार्गावर कंटेनरच्या धडकेत रिक्षातील 6 प्रवाशी जागीच ठार
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Kopargaon Highway Accident: कोपरगाव महामार्गावर कंटेनरने ॲपेरिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेत 6 जण जागीच ठार झाले. ही घटना कोपरगाव महामार्गावर पगारे वस्तीजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात ॲपेरिक्षाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या अपघातात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला असून, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, झगडेफाट्यावरून ॲपेरिक्षा पॅसेंजर घेऊन कोपरगावकडे जात असताना, पगारे वस्तीजवळ कोपरगावहुन येत असलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली. यात ॲपेरिक्षातील 6 प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. (हेही वाचा -Mumbai AC Local Train: तिकीट दरात कपात होताच गारेगार प्रवासासाठी मुंबईकरांची गर्दी, एसील लोकल प्रवाशांच्या संख्येत वाढ)

दरम्यान, या अपघातात राजाबाई साहेबराव खरात (वय 60, रा. चांदेकसारे, ता. कोपरगाव), आत्माराम जमानसा नाकोडे (वय 65 रा. वावी ता. सिन्नर), पूजा नानासाहेब गायकवाड (वय 20, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (वय 20 रा. चांदेकसारे ता. कोपरगाव), शैला शिवाजी खरात (वय 42), शिवाजी मारुती खरात (वय 52) यांचा मृत्यू झाला आहे. आहेत. यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी माहिती दिली आहे.

राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत आहे. आज पुणे सोलापूर महामार्गावर थांबलेल्या पिकअपला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली. यात तीन गाड्यांच्या विचित्र अपघात झाला. यात पिकअप व ईर्टिका चालक मृत्यूमुखी पडले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.